पू. सौरभदादा, ‘स्वतःचा उद्धार कसा करावा ?’, हे तुम्हीच सांगा !

पू. सौरभ जोशी
कु. प्रणिता भोर
कु. प्रणिता भोर

 ‘२८.५.२०२१ या दिवशी मी पू. सौरभदादांच्या खोलीत बसले होते. त्या वेळी देवाने मला पुढील कविता सुचवली.

किती कृतज्ञ राहू मी तुमच्या चरणी पूज्य दादा (टीप १)
मनात माझ्या संघर्षाचे वादळ असता ।
तुमच्या चरणांजवळी तुम्ही बोलावून घेता ।। १ ।।

नाही व्यक्त होत मी कोणाकडे, इथेही नाही बोलत मोकळेपणाने ।
तुम्ही समोर असतांनासुद्धा मी मनातल्या मनातच बोलत असते ।
गुरूंचेच रूप तुम्ही, मनातले विचार
जाणून तुम्हीच ते नष्ट करता ।। २ ।।

जेव्हा जेव्हा आवश्यकता असते,तेव्हा तेव्हा तुम्ही बोलावून घेता ।
आणि मनाची स्थिती तुम्ही संपूर्णच पालटून टाकता ।
पुन्हा प्रयत्न करण्यासाठी किती ऊर्जा देता ।। ३ ।।

८४ लक्ष योनींमधून मिळाला हा मनुष्य जन्म ।
लाभले हे गुरु साक्षात् श्रीनारायण (टीप २)
कसा हो स्वतःचा उद्धार करावा; पूज्य दादा, तुम्हीच सांगा ।। ४ ।।

स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त मी ।
असते स्वेच्छा मनी माझ्या, परेच्छेने कसे जगायचे ?
ते तुमच्याकडून मला शिकता येऊ दे ।। ५ ।।

कशाला हव्या त्या अपेक्षा आणि
परिपूर्णतेचा अट्टाहास इतरांकडून ।
जेव्हा भाव आणि इतरांना समजून घेण्याची परिपूर्णता ।
भगवंताला अपेक्षित आहे माझ्याकडून ।। ६ ।।

गुरुमाऊलीला आम्ही तुमच्याकडून
कितीतरी शिकणे अपेक्षित आहे ।
पूज्य दादा तुमच्या सहवासाचे हे भाग्य आम्हा लाभले ।
तुम्ही शिकवता ते तुम्हीच कृतीत आणून घ्या,
तुम्हीच कृतीत आणून घ्या ।। ७ ।।

टीप १ : सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी

टीप २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले.

– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२१)