पू. सौरभ जोशी यांच्याविषयी सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांना जाणवलेली सूत्रे
१. पू. सौरभ जोशी यांचा अचानक भ्रमणभाष आल्याने पुष्कळ आनंद होऊन मनामध्ये अपार कृतज्ञता वाटणे
‘२.४.२०२० ला रात्री पू. सौरभदादांचा (सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांचा) मला भ्रमणभाष आला. (पू. सौरभदादा यांचे वडील श्री. संजय जोशी पू. सौरभदादांच्या मनातील ओळखून त्यानुसार साधकांना भ्रमणभाष करतात आणि पू. सौरभदादा साधकांशी बोलतात. त्याचा अर्थही श्री. संजय जोशी सांगतात.) अचानक पू. सौरभदादांचा भ्रमणभाष आल्याने मलाही पुष्कळ आनंद झाला. मला त्यांच्याप्रती अपार कृतज्ञता वाटत होती. पू. दादा बोलत असतांना पुष्कळ हसत होते. बोलता बोलता ते मध्येच गंभीर झाले. त्या वेळी मला चैतन्य मिळत होते. नंतर ते हसू लागले.
२. घरासमोरील एक रस्ता बंद केल्यामुळे वसाहतीत (कॉलनीमध्ये) तणावाचे वातावरण निर्माण होणे
३.४.२०२० ला रात्री ९.३० च्या सुमारास आमच्या शेजारच्या घरासमोर एक अन्य धर्मीय थुंकून गेले होते. त्यामुळे सर्वांनाच थोडासा ताण आला होता. आमच्या घरासमोरील रस्ता सार्वजनिक असला, तरी कॉलनीत (वसाहतीत) येण्या-जाण्यासाठीचा असल्याने या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती; परंतु या कालावधीमध्ये अन्य धर्मियांचे येणे-जाणे मात्र पुष्कळ वाढले होते. यावर उपाय म्हणून कॉलनीतील चार पैकी दोन रस्ते बंद करायचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आमच्या घरासमोरील एक रस्ता बंद केला होता. रस्ता बंद करण्यासाठी चार काठ्या लावल्या होत्या; परंतु दहा मिनिटांतच महानगरपालिकेचे लोक येऊन त्यांनी त्या काठ्या काढल्या आणि सांगितले, ‘सार्वजनिक रस्ता अशा प्रकारे बंद करता येणार नाही.’ त्या वेळी प्रश्न पडला, ‘इतक्या तातडीने महानगरपालिकेचे लोक तेथे कसे आले ?’ एकूणच या सगळ्या प्रसंगामुळे कॉलनीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
३. पू. सौरभदादांनी आधीच भ्रमणभाष करून ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करून घेतली’, असे लक्षात येणे
विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या कृपेमुळे या सर्व प्रसंगांवर मात करता येऊन मला स्थिर रहाता आले. ‘काही (अघटित) प्रसंग उद्भवलाच, तर आपण काय करू शकतो ?’, या दृष्टीने माझ्याकडून चिंतन झाले. पू. सौरभदादांनी आधीच भ्रमणभाष करून ‘पुढे होणार्या (अघटित) प्रसंगासाठी माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करून घेतली’, असे माझ्या लक्षात आले.
गुरुमाऊली इतक्या भीषण आपत्काळातही सर्व साधकांचे रक्षण करत आहे, यासाठी मी शरणागत भावाने गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (१२.४.२०२०)