अनिल परब यांना १९ एप्रिलपर्यंत उच्च न्यायालयाचा दिलासा
साई रिसॉर्टचे वादग्रस्त प्रकरण !
दापोली – रत्नागिरीचे माजी पालकमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुरुड (दापोली) येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना १९ एप्रिलपर्यंत अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडीच्या) कारवाईपासून संरक्षण दिले आहे. परब यांना देण्यात आलेले अंतरिम संरक्षण आहे, तसेच ठेवण्यात आले आहे.
Relief to Shiv Sena (UBT) leader Anil Parab extended till April 19, 2023.
Parab is accused in a money laundering case.
The case comes from a complaint alleging environmental law violation at a land located in Dapoli, Maharashtra. @advanilparab @dir_ed #BombayHighCourt pic.twitter.com/n2WRIt6HHL
— Bar & Bench (@barandbench) April 12, 2023
मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम अवैधपणे करण्यात आले आहे. तसेच या बांधकाम प्रकरणी केंद्रशासनाच्या पर्यावरण नियमांचेही उल्लंघन करण्यात आल्यामुळे परब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी अंमलबजावणी संचलनालयाने केली आहे. आता परब यांना न्यायालयाने पुन्हा दिलासा दिला आहे.