नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

सौ. प्राजक्ता जोशी

‘इंग्रजीत एक सुविचार आहे, ‘When nails grow long, we cut nails, not fingers. Similarly, when misunderstandings grow up, cut your ego & not your relations.’ येथे नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.

आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. नखांच्या रंगानुसार विविध आजार ओळखता येतात. सध्याच्या धावपळीच्या काळात नखे कापायला एखाद्या ठराविक दिवशी वेळ मिळतोच, असे नाही. बर्‍याच जणांना रविवारी सुटी असल्याने बहुतेक जण रविवारीच नखे कापतात. काही जणांना ‘नखे कोणत्या वारी कापल्यास योग्य ?’, अशी जिज्ञासा असते.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, (होरा म्हणजे १ घंट्याचा कालावधी.) त्या ग्रहाचे नाव त्या वाराला दिलेले आहे, उदा. रविवारी सूर्योदयाच्या वेळी रवि ग्रहाचा होरा असल्याने त्याला ‘रविवार’ असे नाव आहे. नखे वाढवल्याने देहात तमोेगुण वाढतो. वार हे होर्‍यानुसार ठरत असल्याने होर्‍यानुसार करावयाची कृत्ये पाहिल्यास लक्षात येते की, व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी नखे कापण्यासाठी शनिवार आणि रविवार सोडून इतर सर्व वार योग्य आहेत. ‘कोणत्या दिवशी नखे कापल्यास नक्की काय लाभ होतो ?’, याचा अंदाज येथे मांडला आहे.

वारांनुसार नखे कापल्याने होणारी फलप्राप्ती

कापलेली नखे घरात पडू नयेत, याची काळजी अवश्य घ्यावी. नखे एका कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कुणाच्याही हातात पडणार नाहीत, अशा प्रकारे टाकून द्यावीत.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.