‘लेट्स चेंज’ या चित्रपटातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार स्वच्छतेचे धडे !
मुंबई, ११ एप्रिल (वार्ता.) – स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आणून नवी मुंबई येथील श्री समर्थ फिल्मस्चा ‘लेट्स चेंज’ हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमध्ये दाखवण्यास शिक्षण विभागाकडून अनुमती देण्यात आली आहे. केंद्रशासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारित असल्यामुळे हा चित्रपट पहाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले आहे. चित्रपट पहाण्यासाठी प्रतिविद्यार्थ्याकडून २० रुपयांपर्यंत शुल्क आकारता येणार आहे; मात्र चित्रपट पहाण्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती न करण्याची सूचना दिली आहे.