श्रीमती धनश्री देशपांडे (वय ४६ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या श्रीमती धनश्री देशपांडे यांचा चैत्र कृष्ण सप्तमी, म्हणजे १२.४.२०२३ या दिवशी ४६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीमती धनश्री देशपांडे यांना ४६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !
१. श्री गुरूंवरील श्रद्धा
‘वर्ष २०२१ मध्ये माझी मुलगी श्रीमती धनश्री देशपांडे हिच्या जीवनात पती निधनाचा मोठा प्रसंग घडला. अकस्मात संकट येऊन उभे राहिले. पदरात दोन लहान मुले होती. असे असूनही श्री गुरूंवरील श्रद्धा आणि त्यांनी दिलेली अध्यात्माची शिकवण यांमुळे ती त्यातून पटकन् सावरली.
२. परिस्थिती स्वीकारणे
उर्वरित आयुष्यात तिने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. ‘आयुष्यातील मोठी देवाण-घेवाण आता संपली असून पुढील आयुष्यात केवळ साधनाच करायची आहे’, असे तिने मनाशी ठरवले आणि आश्रमजीवन स्वीकारले. चार-सहा मासांतच ती पती निधनाच्या धक्क्यातून सावरली. तिने आनंदाने परिस्थिती स्वीकारली.
३. सतर्कता
साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘गोव्यात आश्रमामध्ये रहायचे, तर काय काय लागू शकते ? कागदपत्रे आदींची जुळवाजुळव करणे, शासनाकडून मिळणार्या सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची माहिती काढणे, शासकीय कार्यालयात जाऊन तेथील कर्मचार्यांना भेटणे, इत्यादी गोष्टी ती सतर्कतेने करते. ‘या सर्वांत श्री गुरुतत्त्वही तिला साहाय्य करते’, असे माझ्या लक्षात आले.
४. धडाडी
तिच्यातील धडाडी हा गुण लक्षात येतो. गोवा तिच्यासाठी नवीन आहे. कुठे कसे जायचे काहीच ठाऊक नाही. येथील भाषाही निराळी आहे, तरी ती माहिती घेत, वाट काढत पुढे जाते. स्वतःला हव्या असलेल्या वस्तूंसाठी ती कुणावर अवलंबून रहात नाही.
५. तत्त्वनिष्ठता
तिच्यामध्ये तत्त्वनिष्ठताही आहे. काही चुकीचे होत असल्यास ती तसे लगेच निदर्शनास आणून देते, उदा. आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी सेवा करतांना लक्षात आलेली सूत्रे उत्तरदायी साधकांना लिहून देणे इत्यादी.
६. सेवाभाव
आश्रमातील कुठलीही सेवा करण्याची तिची सिद्धता असते. अशक्य असल्यास पुढे मांडणे आणि नसल्यास स्वतःच्या वेळेचे सुयोग्य नियोजन करून ती दिलेल्या सेवा पूर्ण करते, उदा. आठवड्यातून एकदा तिला सकाळी ८.३० वाजता अल्पाहार बनवण्याची सेवा असते. तिची आश्रमात पोचण्याची वेळ ८.१५ वाजताची आहे. अशा वेळी ती साधकांचे साहाय्य घेऊन वाहनाची तडजोड करते आणि सकाळी लवकर येऊन आश्रमातील स्वच्छता सेवा पूर्ण करते अन् नंतर अल्पाहार बनवण्याच्या सेवेसाठी जाते. अल्पाहार बनवण्याची सेवा आहे; म्हणून स्वच्छता सेवा उशिरा किंवा नंतर कधीतरी केली, असे कधी होत नाही. तिला नेमून दिलेली नियमित सेवाही ती आवडीने पूर्ण करते.
७. मुलांना साधनेचे संस्कार करणे
ती स्वतःच्या मुलांना भावनिक स्तरावर न हाताळता साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना साधनेसाठी उद्युक्त करते.’
– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(६.४.२०२३)
श्रीमती धनश्री देशपांडे यांची काही गुणवैशिष्ट्ये
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या श्रीमती धनश्री देशपांडे यांच्याविषयी त्यांचे भाऊ श्री. धैवत वाघमारे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. जवळीक साधणे
‘रामनाथी आश्रमात आल्यावर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकल्यावर ताई आश्रमात सेवा करू लागली. तेव्हा तिचा पुष्कळ साधकांशी संबंध येऊ लागला. सर्वांशीच तिने काही आठवड्यांतच जवळीक साधली.
२. वर्तमान काळात रहाणे
सेवा करतांना अनेक कार्यपद्धती पाळाव्या लागतात, तसेच कधी ऐनवेळी काही अडचणी येतात. त्या वेळी जरी तिच्या मनाविरुद्ध घडत असले, तरी ती ते आईला (श्रीमती अलका वाघमारे यांना) सांगते आणि लगेच वर्तमानात येऊन अन् परिस्थिती स्वीकारून संबंधित प्रक्रिया पूर्ण करते.
३. आश्रमजीवन स्वीकारल्यावर मनावरील ताण निवळून चेहरा आनंदी होणे
पतीच्या निधनानंतर तिच्यावर पुष्कळ ताण होता. ती रामनाथी आश्रमात आली. तेव्हा तिच्या चेहर्यावर तो दिसायचा. जसजशी ती आश्रमजीवनाशी एकरूप होऊ लागली, तसतसा तिच्या मनावरील ताण निवळत गेला. आता तिचा चेहरा पूर्वीपेक्षा पुष्कळ आनंदी आणि उत्साही दिसतो.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२३)