मध्यप्रदेशमध्ये दलित हिंदु युवतीचे बलपूर्वकने धर्मांतर करणार्या लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
|
इंदूर (मध्यप्रदेश) – लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्वर्या चव्हाण या दलित हिंदु युवतीने इरशाद याच्या विरोधात बाडगोडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
१. तक्रारीत नमूद केल्यानुसार, हिंदु तरुणीला इरशाद याने स्वतःचे नाव शक्ती चौहान असे सांगितले होते. ऐश्वर्या आणि शक्ती चौहान (उपाख्य इरशाद) हे वर्ष २०१६ पासून विवाह न करताच एकत्र रहात होते. इरशाद हा एका गाडीवर चालक म्हणून काम करत होता. इरशादचे सत्य समोर आल्यावर तो ऐश्वर्याला छळू लागला.
२. ऐश्वर्याला इरशादपासून २ मुले झाली. वर्ष २०२२ मध्ये इरशाद आणि त्याचा भाऊ मुकीम याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. तिने धर्मांतराला नकार दिल्यामुळे या दोघांनी तिला जातीवाचक शिव्या दिल्या. मुकीम याने तिच्यावर बलात्कार केला.
३. ‘तू धर्मांतर केले नाहीस, तर तुझ्यावर वारंवार बलात्कार करून तुझी हत्या करू’, अशी या दोघांनी तिला धमकी दिली. तिने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी तिला घरी पोचण्यास साहाय्य केले. ऐश्वर्या हिने तक्रार केल्यानंतर इरशाद पसार झाला आहे.
संपादकीय भूमिका‘दलित-मुसलमान भाई भाई’, म्हणणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ? |