रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
अ. ‘आश्रम पुष्कळ छान, म्हणजे उत्कृष्ट आहे. येथे मला मिळालेला आंतरिक आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.’
आ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय !
१. ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर मला एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. सूक्ष्म शक्तींचा स्थूल गोष्टींवर झालेला परिणाम पहाणे आश्चर्यकारक होते. वैदिक शास्त्र शिकवण्यासाठी वैज्ञानिक परिमाणांचा उपयोग करून मिळवलेले हे ज्ञान समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचवायला हवे. एक उत्तम मार्ग दाखवल्याबद्दल मी संयोजक आणि संत यांना नमन करतो.’
डॉ. सुनीलकुमार चौहान, कांगरा, हिमाचलप्रदेश.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |