परात्पर गुरु पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्यातील सामर्थ्याची साधकाला आलेली प्रचीती !
१. साधकाला परात्पर गुरु पांडे महाराज (प.पू. बाबा) यांच्या चरणांवर डोके ठेवण्याची इच्छा होणे आणि प.पू. बाबा यांनी सूक्ष्मातून साधकाची इच्छा जाणून त्याच्याशी बोलणे
१ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवण्याची इच्छा सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांच्याशी सूक्ष्मातून साधलेला संवाद : ‘एकदा मला परात्पर गुरु पांडे महाराज (प.पू. बाबा) यांची पुष्कळ आठवण येत होती. मला ‘काय करावे ?’, ते कळत नव्हते. ‘आताच त्यांच्याकडे जावे आणि त्यांच्या चरणांवर डोके ठेवावे’, असे मला वाटत होते. मी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना म्हणालो, ‘परात्पर गुरुदेव, तुम्हीच माझी ही इच्छा पूर्ण करा.’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘साधनेत ईश्वरेच्छा महत्त्वाची असते.’ तेव्हा मी म्हणालो, ‘होय गुरुदेव, मी तर साधा भक्त आहे. देव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो.’ त्यानंतर मी त्यांचे स्मरण करत झोपलो.
१ आ. दुसर्या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकाशी बोलणे : दुसर्या दिवशी मी साधकांना आणण्यासाठी चारचाकी बाहेर काढत असतांना प.पू. बाबा माझ्या जवळ आले. ते माझ्याशी काहीतरी बोलत होते. ते मला काहीतरी विचारत होते. तेव्हा त्यांना पाहून माझे भान हरपले आणि माझे मन निर्विचार झाले. ‘ते काय बोलत आहेत ?’, हे मला समजत नव्हते. तेव्हा प.पू. बाबा माझ्याकडे पाहून हसले आणि पुढे गेले. मला वाटले, ‘माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना ?’ मी परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. बाबा यांची क्षमा मागितली. नंतर रात्री झोपतांना मला काल परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून झालेल्या संवादाची आठवण झाली. माझ्या लक्षात आले, ‘प.पू. बाबांच्या चरणांवर डोके ठेवण्याची माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते माझ्या जवळ येऊन काही विचारत होते.’
२. वाहनांसंबंधी कागदपत्रे ‘आर्.टी.ओ.’ कार्यालयातून गहाळ होणे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांचा धावा केल्यावर कागदपत्रे सापडणे
मी लोकांच्या वाहनांची ‘आर्.टी.ओ.’( R.T.O.) संबंधी कामे करत असतांना मार्च २०१६ मध्ये २ – ३ व्यक्तींच्या वाहनांसंबंधी महत्त्वाची कागदपत्रे ‘आर्.टी.ओ.’च्या कार्यालयातून गहाळ झाली. ती मूळ कागदपत्रे असल्याने नवीन कागदपत्रे मिळवणे पुष्कळ कठीण होते. एका व्यक्तीला तिची कागदपत्रे तातडीने द्यायची होती. ती कागदपत्रे गहाळ झाल्याने पुष्कळ वाद निर्माण झाला होता. मी पुष्कळ प्रयत्न करूनही ती कागदपत्रे सापडत नव्हती. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा केला. त्या वेळी मला ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्राने हरवलेली वस्तू मिळाली’, अशा आशयाची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या अनुभूतीची आठवण झाली.
‘परात्पर गुरु पांडे महाराज मला मंत्र कसे देतील ?’, या विचाराने मला काही सुचत नव्हते. मी त्यांना प्रार्थना केली आणि त्यांचे भावपूर्ण स्मरण केले. नंतर मी ‘परात्पर गुरु पांडे महाराज’, असे ३ वेळा म्हटले आणि ‘आर्.टी.ओ.’च्या कार्यालयात गेलो. मी अन्य कागदपत्रे घेत असतांना मला एका गठ्ठ्यामध्ये गहाळ झालेली कागदपत्रे मिळाली. मला परात्पर गुरु पांडे महाराज यांची तीव्रतेने आठवण झाली. खरेतर आदल्या दिवशीच मी त्या गठ्ठ्यामध्ये कागदपत्रे शोधली होती.’
– श्री. कृष्णा द. आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |