धर्मांध मुसलमानाच्या छळाला कंटाळून दलित हिंदु युवतीची आत्महत्या !
पोलिसांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष
कानपूर (उत्तरप्रदेश) – साचेंडी येथील एका २० वर्षीय हिंदु युवतीने महंमद शमशाद याच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या युवतीचा विवाह निश्चित झाला होता. त्यानिमित्ताने तिच्या घरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी शमशाद याने त्याच्या मित्रांसह युवतीच्या घरात प्रवेश केला आणि ‘तू अन्य कुणाशीही विवाह करू शकत नाहीस. तू जर विवाह केलास, तर विवाहाच्या मंडपातून तुला पळवून नेऊन मी तुझ्याशी विवाह करीन’, अशी धमकी त्याने दिली होती.
Depressed by Shamshad’s harassment, Hindu girl commits suicide in Sachendi, Kanpur; UP Police say he is a ‘minor’ https://t.co/ttepSWb3vs
— HinduPost (@hindupost) April 10, 2023
या युवतीच्या भावाने सांगितले, ‘शमदाद माझ्या बहिणीवर विवाह करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता. याविषयी आम्ही दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेलो होतो; मात्र पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तिसर्या वेळी आम्ही पोलीस ठाण्यात गेलो असता, त्याच वेळी माझ्या बहिणीने घरी आत्महत्या केली.’ या घटनेनंतर पोलिसांकडून शमशाद हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|