उमेदवारी मिळण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या समर्थकांकडून मंदिर आणि मशीद येथे प्रार्थना !

आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक यांनी मशिदीत जाऊन प्रार्थना केली

बेंगळुरू – विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने उमेदवारांची सूची घोषित केली आहे. तिसर्‍या टप्प्यात प्रसिद्ध होणार्‍या सूचीत पुलकेशीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक यांनी मंदिर अन् मशीद येथे जाऊन विशेष प्रार्थना केली. (सातत्याने हिंदु धर्मावर आघात करणार्‍या काँग्रेसवाल्यांवर देवाची कृपा कशी होणार ? – संपादक) श्रीनिवास मूर्ती यांना उमेदवारी देण्यास विलंब होत असल्याने त्यांचे समर्थक अप्रसन्न आहेत.

या वेळी काँग्रेसचे समर्थक म्हणाले, ‘‘काँग्रेस श्रेष्ठींकडे जाऊन मूर्ती यांना तिकीट देण्यासाठी विनंती करणे शक्य नसल्याने आम्ही देवाला शरण गेलो आहोत. आम्ही करत असलेल्या प्रार्थनेमुळे अखंड श्रीनिवास मूर्ती यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देऊ देेे. काँग्रेसने मूर्ती यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मागील वेळेेपेक्षा अधिक मतांनी निवडून आणू.’’

संपादकीय भूमिका 

काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?