मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणार्याला अटक !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणारे राजेश आगवणे (वय ४३ वर्षे) याला मुंबईतील धारावी येथून पोलिसांनी अटक केली आहे. १० एप्रिलला रात्री ‘११२’ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर दूरभाष करून ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’, अशी धमकी देण्यात आली होती. पुणे शहरातील वारजे परिसरातून हा दूरभाष करण्यात आला होता. पोलिसांनी कह्यात घेतले, तेव्हा आगवणे मद्याच्या नशेत होता.
“एकनाथ शिंदेंना उडवणार आहे”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील एक जण अटकेतhttps://t.co/G0AMhWEBSc#EknathShinde #LifeThreat #Pune
— LoksattaLive (@LoksattaLive) April 11, 2023
राजेश आगवणे हा धारावी येथे रहातो, तर त्याची पत्नी कोथरूड येथे नोकरी करते. तिला भेटण्यासाठी तो पुणे येथे गेला असतांना त्याच्या छातीत दुखत होते. या वेळी ‘रुग्णवाहिका पाठवा’, हे सांगण्यासाठी दूरभाष केला असतांना त्याने धमकी दिल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात निष्पन्न झाले.