काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचे स्वपक्षाच्या सरकारविरोधात उपोषण
फलकांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची छायाचित्रे नव्हती !
जयपूर (राजस्थान) – राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राज्यातील त्यांच्याच पक्षाच्या सरकारच्या विरोधात येथील हुतात्मा स्मारकावर मौन पाळत धरणे आंदोलन केले. सरकारकडून भ्रष्टाचार्यांवर कारवाई होत नसल्याचा आणि भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भ्रष्टाचार की जांच की मांग को लेकर राजस्थान कांग्रेस के वरिष्ठ नेता सचिन पायलट जयपुर में एक दिन के अनशन पर बैठे हैं.आइए जानते हैं कि आखिर पायलट को अनशन पर किन वजहों से बैठना पड़ा-#SachinPilot #AshokGehlot #Congress #Rajasthan https://t.co/vCfzS5Rpb2
— ABP News (@ABPNews) April 11, 2023
या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांची छायाचित्रे नव्हती. आंदोलनस्थळी पायलट यांचे समर्थक देशभक्तीपर गाण्यांवर नाचत होते आणि पायलट यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.