गुरुराया, तुमच्या भेटीची ओढ लागली ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एकदा भावसत्संग संपल्यावर माझा भाव जागृत होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मला पुढील काव्यपुष्प स्फुरले.
स्वभावदोष आणि अहं येतात प्रतिदिन मला न्यायला ।
आता मन माझे तळमळे तुमच्या चरणांशी यायला ।। १ ।।
भीती वाटायची मला आढाव्यात जायला ।
आता बरे वाटते मला आत्मनिवेदन करायला ।। २ ।।
सत्संगात तुमच्या मला ‘भावा’ची व्याख्या कळली ।
‘कधी होईल भेट ?’ भेटीची ओढ लागली ।
गुरुराया, तुमच्या भेटीची ओढ लागली ।। ३ ।।
– कु. ओमकार राऊत (वय १८ वर्षे), कणकवली, सिंधुदुर्ग. (१.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |