खोपोलीत धर्मांतरविरोधी कायद्यासाठी आंदोलन
रायगड , १० एप्रिल (वार्ता.) – देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. गरीब हिंदूंना फसवून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर केले जाते. पूर्वोत्तर भारतात आज अनेक राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत. हे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी जात-पात, पद, पक्ष, संप्रदाय आणि संघटना बाजूला ठेवून धर्मासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी येथे केले. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी खोपोली येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते.
आंदोलनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे खोपोली विभाग कार्यवाह श्री. दीपक गिरी, तसेच धर्मप्रेमी श्री. महेश बारी आणि श्री. मनोज कांगणे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हातात भगवे ध्वज आणि हस्तफलक घेऊन घोषणा देण्यात येत होत्या.