राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून दर्जा रहित !
देहली – केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून असलेला दर्जा रहित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करत नसल्याने हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा ठेवावा का ?’, याविषयी आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाला म्हणणे मांडण्यासाठी बोलावले होते. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाची बाजू मांडली. त्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. हा निर्णय म्हणजे पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांना मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.