पुण्यामध्ये आय.पी.एल्. सामन्यावर सट्टा लावणार्या बुकींसह ९ जणांना अटक !
पुणे – कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये आय.पी.एल्. क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणार्यांना बुकींसह ९ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मुंबई इंडियन्स विरोधात चेन्नई सुपर या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात होता. या कारवाईमध्ये संगणक, ३ लॅपटॉप (भ्रमणसंगणक) १८ भ्रमणभाष आणि १२ सहस्र रुपयांची रोख रक्कम असा अनुमाने ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या आय.पी.एल्. क्रिकेट सामने चालू असल्याने शहरातील काही हॉटेल, पब, बार यांमध्येही सट्टा खेळला जात आहे.