दुग्धजन्य पदार्थ आयातीविरोधात मंचर (पुणे) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन !
मंचर (पुणे) – केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीच्या हालचाली चालू केल्या आहेत. दुग्धजन्य पदार्थ आयातीचा निर्णय घेतल्यास दूधउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील. दुर्दैवाने आयातीचा निर्णय झाल्यास ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ रस्त्यावर उतरून ‘जेल भरो आंदोलन’ करेल, अशी चेतावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली आहे. पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या समोर ९ एप्रिल या दिवशी आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.