अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर आक्रमण करणार्यांना लवकरात लवकर अटक करा ! – प.पू. प्राणलिंग स्वामीजी
निपाणी – अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर हुबळी येथे अज्ञात समाजकंटकांनी आक्रमण केले आहे. तरी अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर आक्रमण करणार्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामी यांनी केली. निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांना विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी ही मागणी केली.
या वेळी श्री दत्तपीठ तमनकावाड्याचे मठाधीश प.पू. सद्गुरु साचीदानंद बाबा, श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्रभुलिंग स्वामीजी, मातृशक्तीच्या जिल्हाप्रमुख सुचित्रा कुलकर्णी, विश्व हिंदु परिषद निपाणीचे प्रमुख मृणाल कुरबेट्टी, अभिजित सादळकर, रोहन राऊत, उत्तम कमते, चारुदत्त पावले, बजरंग दलाचे निपाणी शहराध्यक्ष प्रवीण भिसे, युवराज जाधव, योगेश चौगुले, मायाप्पा राहुत, सागर श्रीखंडे यांसह अन्य उपस्थित होते.