वापी (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमंताला साकडे घालून हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाचा शुभारंभ
वापी (गुजरात) – येथील श्री खोडीयारमाता मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवीची ओटी भरण्यात आली.
तेथेच असलेल्या हनुमानाच्या मूर्तीसमोर समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित अनेक भाविकांनी सामूहिक प्रार्थना करत हनुमंताला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले. या वेळी श्री. भागवत यांनी मंत्रोच्चारात संकल्प केला.