राज्यात पुढील ५ दिवस अवेळी पावसाची शक्यता !
मुंबई – राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पुढील ५ दिवसांत अवेळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. १३ ते १५ एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह गारपीटही होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.