‘मद्यविक्रीचे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी ग्रामस्थांना द्यावी लागत असेल, तर जनतेच्या पैशातून पोलिसांना पोसायचे कशाला ?
‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील कोलझर येथे मद्याची अवैधरित्या विक्री केली जाते. तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात मद्याच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे मद्यविक्रीचे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ग्रामस्थांनी येथील पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे दिली आहे.’ (९.४.२०२३)