इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद : दगडफेकीत ३ जण घायाळ

मशिदीजवळील छतावरून दगडफेक

क्रिकेट खेळावरून धर्मांधांची मशिदीवरुन दगडफेक

इटावा (उत्तरप्रदेश) – येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. या वेळी काही धर्मांध हे मशिदीजवळील छतावरून दगडफेक करतांना दिसले. या दगडफेकीत तीन जण घायाळ झाले. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

(सौजन्य : IndiaTV) 

९ एप्रिल या दिवशी काही तरुण कटरा समशेर खान या भागात पोचले. या तरुणांनी तेथील दुकानांवर दगडफेक केली आणि गोळीबार चालू केला. गोळीबार केल्यानंतर तरुणांनी तेथून पळ काढला. अनुमाने दोन घंट्यांनंतर ते तरुण पुन्हा तेथे आले. त्यांनी पुन्हा दगडफेक आणि गोळीबार केला. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

छतावर अशा प्रकारे दगडांचा साठा कुणी आणि कशासाठी केला होता ?, याचे अन्वेषण करून पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे !