कोकण रेल्वे मार्गावर १२ एप्रिल ते जूनपर्यंत धावणार उन्हाळी विशेष गाड्या

कोकणातील पर्यटन अनुभवण्याची पर्यटकांना संधी

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामात गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील उधना ते कोकण रेल्वे मार्गे मंगळुरू दरम्यान धावणार्‍या आणखी उन्हाळी विशेष गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालू करण्यात आल्या आहेत. या गाड्या १२ एप्रिलपासून चालू होणार असून त्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवल्या जाणार आहेत.  या विशेष गाड्या कोकणातील रेल्वेस्थानकांवरही थांबणार असल्याने येथील पर्यटनाला नव्याने चालना मिळणार आहे.

या गाड्यांमुळे परराज्यातील पर्यटकांना कोकण पहाण्याची अनुभवण्याची मोठी संधी मिळणार आहे. संस्कृती, पर्यटन, जगप्रसिद्ध असलेला हापूस आंबा अनुभवायला येण्यासाठी थेट प्रवासाची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ गोव्यात जाणारा पर्यटक कोकणातील पर्यटनाला प्राधान्य देईल, त्यामुळे कोकणातील पर्यटनावर आधारित अर्थकारणाला चालना मिळेल.

गाडी क्र. ०९०५७ उधना जंक्शन मंगळुरू जंक्शन विशेष साप्ताहिक गाडी  १२, १९, २६ एप्रिल, ०३, १०,१७, २४, ३१ मे, तसेच ०७ जून या दिनांकांना रात्री ८ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसर्‍या दिवशी १९:०४ वाजता पोचणार आहे.

गाडी क्र. ०९०५८ मंगळुरू जंक्शन उधना जंक्शन मंगळुरू जंक्शन येथून साप्ताहिक विशेष गाडी रात्री २१:१० वाजता गुरुवार १३,२०,२७ एप्रिल ०४, ११, १८ आणि २५ मे, १ जून आणि ८ जून २०२३ या दिनांकांना सुटेल. ही गाडी उधना जंक्शनला दुसर्‍या दिवशी २१.०५ वाजता पोचेल.