दमोह (मध्यप्रदेश) येथे समाजकंटकांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
दमोह (मध्यप्रदेश) – येथील पिपरिया साहनी या गावात असणार्या सार्वजनिक मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी ८ एप्रिलला रात्री तोडफोड केली. ९ एप्रिलला सकाळी राज किशोर राजपूत हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मूर्तीची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर सर्व गावकरी पटेरा पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. येथे १५ दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकांनी शिवलिंग चोरून नेले होते. पोलिसांनी काही घंट्यांतच शिवलिंग शोधून काढले.
Madhya Pradesh: Idol of Bajrang Bali vandalised in a temple in Damoh, FIR registered after tension in the villagehttps://t.co/aerh0PW6b3
— OpIndia.com (@OpIndia_com) April 10, 2023
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |