खलिस्तानी अमृतपाल याचा साथीदार पपलप्रीत याला अटक
चंडीगड – ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याचा जवळचा साथीदार पपलप्रीत याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पपलप्रीत सिंह शरण येण्याच्या सिद्धतेत होता. त्याला अमृतसरमधील त्याच्या गावात येऊन शरण यायचे होते; मात्र पपलप्रीत होशियारपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला तेथून अटक करण्यात आली. अमृतपाल आणि पपलप्रीत एकाच दुचाकीवरून पसार झाले होते.
अमृतपाल सिंह के करीबी पपलप्रीत सिंह को पुलिस ने किया गिरफ़्तार
◆ पंजाब के होशियारपुर से हुई गिरफ़्तारी #Punjab | Punjab pic.twitter.com/qv7achYtgj
— News24 (@news24tvchannel) April 10, 2023