राहुल गांधी यांचे विदेशातील नको त्या उद्योगपतींशी संबंध ! – काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा दावा
नवी देहली – राहुल गांधी आणि गांधी परिवार यांचे विदेशातील नको त्या उद्योगपतींशी संबंध आहेत. मी याची १० उदाहरणे देऊ शकतो. विदेशात ते कुणाला भेटायला जातात, हे आम्हाला ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटच्या पार्श्वभूमीवर केली आहे. राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत उद्योगपती गौतम अदानी यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेस सोडून गेलेले गुलाम नबी आझाद यांच्यासह ५ नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यावर आझाद यांनी वरील विधान करत प्रतिक्रिया व्यक्त केली.
अवांछित कारोबारियों से हैं राहुल के रिश्ते, मिलने जाते हैं विदेश: आजाद#GhulamNabiAzad #RahulGhandi https://t.co/V1vKMALn2S
— Hindustan (@Live_Hindustan) April 10, 2023
आझाद पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असे अनेक जण म्हणतात; मात्र मला असे वाटत नाही; कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.