सिंधुदुर्ग : कोकणातील पहिल्या शासनमान्य ‘इन्क्युबेशन सेंटर’चे कणकवली येथे उद्घाटन
(‘इन्क्युबेशन सेंटर’ – एखादा नवीन व्यवसाय विकसित करण्यासाठी उद्योजकांना प्रारंभीच्या स्तरापासून व्यवसाय आणि तांत्रिक सेवा, प्रयोगशाळा सुविधा, सल्लागार आदी सेवा पुरवणारे केंद्र)
कणकवली – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ९ एप्रिल या दिवशी शासनमान्य ‘कोकण भूमी टी.बी.आ. फाऊंडेशन’ या कोकणातील पहिल्या ‘इन्क्युबेशन सेंटर’चे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते येथे करण्यात आले. ‘नवीन व्यवसायासाठी लागणार्या सर्व सुविधा या सेंटरमध्ये (केंद्रामध्ये) असणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नवीन उद्योजकांनी घ्यावा. जिल्ह्यात लवकरच ५०० एकर भूमीत आधुनिक तंत्रज्ञान असलेले उद्योग आणणार आहे’, अशी माहिती केंद्रीय मंत्री राणे यांनी या वेळी दिली.
येथील एस्.एस्.पी.एम्. इंजिनीयरिंग महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र इमारतीत ‘इन्क्युबेशन सेंटर’ चालू करण्यात आले आहे.
गरजू मुलींना विनामूल्य सायकल वाटप उपक्रमाचा आज प्रारंभ
कणकवली – केंद्रीय मंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकणार्या गरजू मुलींना विनामूल्य सायकल वाटप करण्याची घोषणा केली आहे. १० एप्रिल या दिवशी आमदार राणे या उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. पहिल्या टप्प्या एकूण ३७९ मुलींना सायकल देण्यात येणार आहे.