मध्यप्रदेशात वादग्रस्त वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणार ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भोपाळ – वादग्रस्त वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी मध्यप्रदेश सरकार पावले उचलणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. या वेळी कथावाचक देवकीनंदन ठाकूर हेही उपस्थित होते. ‘मध्यप्रदेश ही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असणारी भूमी आहे’, असेही ते म्हणाले. देवकीनंदन ठाकूर यांनी कार्यक्रमामध्ये ‘वादग्रस्त वेब सिरीज समाजाला संस्कृतीपासून लांब नेत असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक आहे’, असे म्हणाले होते. त्यानंतर चौहान यांनी वरील आश्‍वासन दिले. या कार्यक्रमामध्ये ठाकूर यांनी आधुनिक शिक्षणपद्धतीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

संपादकीय भूमिका

  • वेबसिरीजसाठी केंद्र सरकारने काही नियमावली प्रसारित केली आहे; मात्र त्याला केराची टोपली दाखवली जाते. एकेका राज्याने अशी बंदी घालण्याऐवजी केंद्राने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक !