हिंदु धर्म संवर्धनाचे अलौकिक कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !
ह.भ.प. सुहासबुवा वझे दैनिक ‘सनातन प्रभात’ हिंदु धर्म संवर्धनाकरता अलौकिक असे कार्य करत आहे. मी स्वतः दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. आजपर्यंत पूर्णपणे हिंदूंच्या समस्या मांडणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ व्यतिरिक्त अन्य दैनिक नाही. सध्या सर्व हिंदूंनी जात-पात, भेदभाव, हेवेदावे आदी सोडून एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक हिंदूने आपला देव-धर्म, देश, संस्कृती यांविषयी जाणून घेणे आणि धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्यावर आपल्याला हिंदु धर्माबद्दल बरीच माहिती मिळते.
सध्या काही पंथ हिंदूंना संपवण्याची भाषा करतात. त्यात धर्मांतराचे प्रकार, लव्ह जिहादची प्रकरणे चालूच आहेत. यांपासून हिंदूंनी सावध रहायला पाहिजे. याविषयीची जागृती दैनिक ‘सनातन प्रभात’मधून होत असते. सत्संग, कथा, कीर्तन, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, हिंदू एकता आंदोलने, हिंदूंचे उत्सव यात आपण सर्व हिंदूंनी सहभागी झालेच पाहिजे. आपल्या मुलांना हिंदु धर्माचे संस्कार, स्तोत्रे, भगवद्गीता, नामस्मरण आदी शिकवले पाहिजे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आपल्या उत्सवाबद्दल पूर्ण माहिती असते. त्याकरता सर्वांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचावा. हिंदु राष्ट्र येण्यासाठी देवाची कृपा व्हावी, यासाठी सर्वांनी सत्यनीतीला धरून हिंदु संस्कार जतन केले पाहिजेत. ते कार्य अनेक संस्था करत आहेत. आपला त्यात सहभाग असावा. ‘जगात भारतासारखा देश नाही आणि हिंदु धर्मासारखा धर्म नाही’, याची जाणीव सर्वांनी ठेवूया आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक होऊया ! ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’
– ह.भ.प. सुहासबुवा वझे, बोरी, फोंडा, गोवा.