९ एप्रिल या दिवशी होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पुढे ढकलली !
धरणगाव – हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, ९ एप्रिल २०२३ या दिवशी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या शेजारील मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पहाता ही सभा थोडी पुढे ढकलण्याच्या केलेल्या विनंतीस मान्यता देऊन ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
श्रीरामनवमीच्या काळात राज्यात आणि विशेषतः जिल्ह्यात जे काही प्रकार घडले आहेत, त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे, त्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. तरी धरणगाव आणि आजूबाजूच्या गावातील सर्व हिंदु बांधवांनी याची नोंद घ्यावी. धरणगाव येथे सभा होणार असून लवकरच पुढील दिनांक घोषित करण्यात येईल, असे समितीच्या वतीने श्री. प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.