पुणे येथे ५० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !
पुणे – चोरी झालेली ‘इर्टिगा’ गाडी परत मिळवून देण्याकरता केलेल्या साहाय्याचा मोबदला म्हणून ५० सहस्र रुपयांची लाचेची मागणी करणारे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवार हे सिंहगड रस्ता पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाने तक्रार प्रविष्ट केली होती. (पोलिसांचेच वर्तन असे असेल, तर कुणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येईल का ? लाच घेणारे पोलीस लाचखोरी आणि लूट कशी रोखणार ? – संपादक)