चांदणी चौकातील वाहतूक १० एप्रिलपासून पर्यायी मार्गाने वळवणार !
पुणे – पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन १ मे या दिवशी होणार आहे. या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करणार असल्याने चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत. चांदणी चौकातून जाणार्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून हा पर्यायी रस्ता वाहतूक वळवण्यासाठी उपलब्ध असणारा आहे. त्या अनुषंगाने लवकरच शासनाकडून परिपत्रक घोषित होईल. १० एप्रिलपासून बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी हा सेवा रस्ता वाहनचालकांसाठी खुला करणार असल्याचे एन्.एच्.ए.आय.ने सांगितले आहे.