रत्नागिरी येथील कु. शौर्य गांगण (वय १० वर्षे) याला देवता आणि संत यांच्या छायाचित्रासंदर्भात आलेल्या अनुभूती
१. श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे पाहून आलेल्या अनुभूती
अ. श्रीकृष्णाचे छायाचित्र : सत्संगात श्रीकृष्णाचे छायाचित्र दाखवून ‘त्याच्याकडे पाहून काय जाणवते?’ असे विचारले. तेव्हा ते छायाचित्र जिवंत असल्याचे जाणवले आणि श्रीकृष्ण बोलत असल्यासारखे वाटले.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र : हे पहातांना त्या छायाचित्रातून ‘गुरुदेव चालत येत आहेत’, असे दिसले.
इ. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र : हे पहातांना गारवा जाणवला.
– सोनाली गांगण (कु. शौर्य गांगण याची आई), रत्नागिरी.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |