हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे होणार्या व्यापक धर्मकार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात आल्याचे छायाचित्रात दिसणे; पण संतांच्या अस्तित्वामुळे ‘त्या निष्प्रभ होऊन निघून गेल्या’, असे जाणवणे
‘१५.२.२०२३ या दिवशी सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जयभवानी प्रशालेच्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर रात्री ९.१५ वाजता आयोजित केलेल्या धर्मप्रेमींच्या बैठकीच्या आरंभी बैठकीचे छायाचित्र काढले. त्या छायाचित्रामध्ये ‘बैठकीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने ‘ऑब्र्स्’ (लिंगदेहांचे गोळे) आले आहेत’, असे दिसत होते. बैठकीच्या समारोपाच्या वेळी बैठकीचे पुन्हा छायाचित्र काढल्यावर त्यात ‘ऑब्र्स्’ विरळ झाले आहेत’, असे दिसून आले. ‘सभेच्या माध्यमातून होणार्या व्यापक धर्मकार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात आल्याने त्यांचे प्राबल्य जाणवत होते; मात्र संतांचे आशीर्वाद आणि अस्तित्व यांमुळे बैठकीच्या समारोपाच्या प्रसंगी वाईट शक्तींचे प्राबल्य न्यून झाले’, असे मला जाणवले.’
– सद्गुरु स्वाती खाडये, सोलापूर (१८.२.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |