पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !
अनधिकृत बांधकाम हटवण्याची नागरिकांची मागणी
(मजार म्हणजे मुसलमान फकिराचे थडगे)
पुणे – एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३ पासून अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. तिथे अचानक ही मजार कुणी बांधली ? अभयारण्यातील हे अनधिकृत बांधकाम तातडीने काढण्यात यावे.
ताम्हिणी अभयारण्यात Land Jihad 💤
पुण्यापासून 70 किमी अंतरावर असलेल्या ताम्हिणी भागास 2013 पासून अभयारण्याचा दर्जा घोषित आहे.
तिथे अचानक ही मजार कुणी बांधली? अभयारण्यातील हे अनधिकृत बांधकाम तातडीने काढण्यात यावे.
जागेचे लोकेशन सोबत जोडलेले आहे.@Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/tTHbSWsP34
— अहम् ब्रह्मास्मि™🚩 (@That_Pune_Guy) April 7, 2023
त्यांनी या मजारीचे नेमके स्थान (लोकेशन) प्रसारित केले आहे. तिथे बर्याच ठीकाणी झाडांच्या कडेने भूमीचे सपाटीकरण चालू आहे.
संपादकीय भूमिका
|