कर्करोग आणि हृदयविकार या आजारांवरही वर्ष २०३० पर्यंत लस येणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – कर्करोग आणि हृदयविकार या आजारांवर वर्ष २०३० पर्यंत लस बनवण्यात येईल, असा दावा अमेरिकेतील तज्ञांनी केला. ‘मॉडर्ना’ या औषध निर्मिती करणार्‍या आस्थापनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी म्हणाले की, आमचे आस्थापन येत्या ५ वर्षांत सर्व प्रकारच्या रोगांवर औषध देऊ शकेल. आमच्याकडे असलेली लस अत्यंत प्रभावी आणि लाखो जीव वाचवणारी असेल. आम्ही जगभरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूमर कर्करोगावर लस प्रदान करू शकू. एकाच इंजेक्शनने अनेक प्रकारचे संक्रमण दूर केले जाऊ शकते. यासह असुरक्षित लोकांनाही कोरोना, फ्लू आणि ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ पासून वाचवले जाऊ शकते.