भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ३ आदिवासी महिलांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंडवत प्रदक्षिणा घालायला भाग पाडले !
बंगालमधील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा महिलांना व्हिडिओ प्रसारित करून आरोप
(दंडवत प्रदक्षिणा म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर लोळण घेत घेत पुढे जाणे)
कोलकाता – बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आदिवासी महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोप बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजूमदार यांनी केला आहे. काही आदिवासी महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला हेता. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दंडवत प्रदक्षिणा घालण्याची शिक्षा दिली. त्यानंतर त्यांना बळजोरीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करायला भाग पाडण्यात आले.
Punishment for joining the BJP! Three tribal women of Bengal have been circled? The video went viral https://t.co/EALLLCFK3K
— YET NEWS (@YETNEWS1) April 8, 2023
मुजूमदार यांनी पीडित महिला दंडवत घालत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘तृणमूल काँग्रेसने आदिवासींचा अवमान केला आहे. मी भारतभरातील आदिवासींना तृणमूल काँग्रेसला विरोध करण्याचे आवाहन करतो. काही दिवसांपूर्वी तपन गोफानगर येथील मार्टिना किसकू, शिउली मार्डी, ठकरान सोरेन आणि मालती मुर्मी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यापैकी तिघींना तृणमूल काँग्रसच्या गुंडांनी दंडवत प्रदक्षिणा घालण्यास भाग पाडले.
संपादकीय भूमिका
|