रामनाथी (गोवा) येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

श्री. दीप संतोष पाटणे

१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात चैतन्य आणि प्रसन्नता जाणवणे

‘रामनाथी (गोवा) येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात चैतन्य आणि प्रसन्नता जाणवते. तेथे सर्वत्र चांगली स्पंदने जाणवतात.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सर्वत्र शुभ्र प्रकाश दिसणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना चैतन्य जाणवणे

वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकांना भेटण्यासाठी दैनिक कार्यालयात आल्या होत्या. त्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘येथे आल्यावर मला सर्वत्र शुभ्र प्रकाश दिसला. येथे सेवा करणार्‍या साधकांचे चेहरे आनंदी दिसत आहेत.’’ तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘येथे पुष्कळ चैतन्य जाणवते.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

अ. दैनिक कार्यालयातील गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पुष्कळ सजीव आणि बोलके झाले आहे. त्याचे वैशिष्ट्य, म्हणजे त्या छायाचित्राकडे कोणत्याही दिशेने पाहिल्यास ‘गुरुदेव आपल्याकडेच पहात आहेत’, असे जाणवते. आश्रम पहातांना साधक, धर्मप्रेमी, हितचिंतक आणि समाजातील व्यक्तीही ही अनुभूती सहजतेने घेऊ शकतात. ही केवळ आणि केवळ श्रीमन्नारायणाची कृपाच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावरील भिंतीवर दिसत असलेले सूर्यकिरण

आ. वर्ष २०२३ मध्ये महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता गुरुदेवांच्या छायाचित्रावर सूर्यकिरण पडले होते. प्रत्यक्षात गुरुदेवांचे छायाचित्र ठेवलेल्या ठिकाणी सूर्यकिरण येणे अशक्यच आहे. ते दृश्य पाहिल्यावर ‘सूर्यनारायणच नारायणस्वरूप गुरुदेवांना भेटण्यासाठी आला आहे’, असे मला वाटले.

इ. सेवा करतांना माझे लक्ष त्या छायाचित्राकडे जाते. त्या वेळी माझे मन निर्विचार होऊन माझे अनुसंधान साधले जाते आणि त्यात रममाण व्हावेसे वाटते.

ई. माझ्या मनाची स्थिती अस्थिर असेल, तर त्या छायाचित्राकडे पाहून मी आत्मनिवेदन करतो. ‘त्या वेळी मला स्थिरतेची अनुभूती येते’, असे मी बर्‍याच वेळा अनुभवले आहे.’

– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.३.२०२३)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक