नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !
७ ते १० एप्रिल या काळात सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत प्रदर्शन खुले !
नवी मुंबई – क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले आहे. ७ ते १० एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत वाशी रेल्वे स्थानकासमोरील ‘सिडको एक्झिबिशन सेंटर’मध्ये हे २१ वे ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची विक्री अन् प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’चे उद्घाटन ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक आणि चित्रपट अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. सामान्य नागरिकास परवडणार्या घरापासून अत्याधुनिक सुखसुविधांनी युक्त घरे प्रदर्शनात उपलब्ध असल्याचे क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी या वेळी सांगितले.