निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – राजपत्रित अधिकारी महासंघ
मुंबई – महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील कर्मचार्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत निवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, असे वक्तव्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर केले. केंद्रशासनाने कर्मचार्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घ्यावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आहे. याला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवल्याचे या वेळी विनोद देसाई यांनी म्हटले.