तमिळनाडूमध्ये लव्ह जिहाद्याच्या विरोधात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !
हिंदु तरुणीकडून मशिदीच्या समोर धरणे आंदोलन
कुडालोर – महेश्वरी या हिंदु तरुणीचे बंकीम अस्लम याने लैंगिक शोषण केले. यामुळे ती गरोदर राहिली. तिच्या कुटुंबियांनी तगादा लावल्यानंतर अस्लम याने तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर तो पसार झाला. त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, तसेच ज्या मशिदीत तिचे धर्मांतर करण्यात आले, तेथे महेश्वरी गेली असता मशिदीतील लोकांनीही तिचे काहीही ऐकले नाही. त्यामुळे महेश्वरी हिने मशिदीसमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी अस्लम याच्याशी बोलून ‘त्याची समजूत काढू’, असे आश्वासन महेश्वरी हिला दिले.
१. चिदंबरम् येथील रहिवासी असणारी महेश्वरी ही बंकीम अस्लम याच्याकडून चालवण्यात येणार्या आईस्क्रीमच्या दुकानात कामाला होती. अस्लम याने महेश्वरी हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोेषण केले. ती गरोदर राहिल्याने त्याने विवाह करण्यास नकार दिला.
२. त्यानंतर महेश्वरी हिच्या कुटुंबियांनी विवाहाचा तगादा लावला. त्या वेळी अस्लम याने ‘महेश्वरी धर्मांतर करणार असेल, तर तिच्याशी विवाह करीन’, अशी अट घातली. कुटुंबियांनी ही अट मान्य केली. त्यानंतर कुडालोर येथील लॅब्बे स्ट्रीटच्या परिसरात असलेल्या मशिदीत तिचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिचा विवाह करण्यात आला.
३. विवाहानंतर काही दिवसांत तिने मुलाला जन्म दिला; मात्र त्यानंतर अस्लम पसार झाला. त्यानंतर तिने मशिदीत जाऊन चौकशी केली; मात्र मशिदीत तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मशिदीत जाऊन तिने अस्लम याची समजूत काढण्याची मागणी केली.
४. मशिदीच्या व्यवस्थापनाने महिला पोलिसांना पाचारण केले आणि महेश्वरी हिला मशिदीच्या परिसरातून बाहेर काढण्यास सांगितले.
संपादकीय भूमिका
|