आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद
रायपूर (छत्तीसगड) – आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही. आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.
शाळांमधून हिंदु धर्माचे शिक्षण का दिले जात नाही ?
शिक्षणाच्या धोरणात पालट करण्याविषयी शंकराचार्य म्हणाले की, जर मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते, तर शाळांमधून हिंदु धर्माचे शिक्षण का दिले जाऊ शकत नाही ?
इतिहास आहे तसा शिकवणे आवश्यक !
‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) पुस्तकांमधून मोगलांचे धडे काढून टाकण्याविषयी शंकराचार्य म्हणाले की, इतिहास जसा आहे, तसा शिकवणे आवश्यक आहे. इतिहास आहे तसा शिकवला पाहिजे.
संत राजकीय पक्षाचे सदस्य झाल्यास ‘महात्मा’ किंवा ‘हिंदु’ रहात नाहीत; कारण राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष असतात !
शंकराचार्य पुढे म्हणाले की, एखादी व्यक्ती किंवा संत एखाद्या राजकीय पक्षाची सदस्य होते, तेव्हा ती ‘महात्मा’ किंवा ‘हिंदु’ रहात नाही, मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असो. धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतल्याविना कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी होऊ शकत नाही; मग तो कोणताही राजकीय पक्ष असो, असे ते म्हणाले.