बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्यांदा तोडफोड !
विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील बापूजी नगरातील श्रीमुनेश्वर मंदिरावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून मंदिरालगत असलेल्या नागदेवतेसाठी बनवण्यात आलेल्या नागकट्ट्याची तोडफोड केली. मंदिरातील ४ नागकट्ट्यांपैकी २ नागकट्टे संपूर्ण फोडून टाकण्यात आले असून अन्य २ नागकट्टे विद्रूप करण्यात आले आहेत. या प्रकरणी विजयनगर येथील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे प्रमुख श्री. एम्.एल्. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली ब्याटरायनपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१. या मंदिरावर सातत्याने ३ वेळा अशा प्रकारचे आक्रमण करण्यात आले आहे. वर्ष २०२० मध्ये मंदिराच्या समोरील भगवा ध्वज जाळून टाकण्यात आला होता. याविषयी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली नव्हती. ‘हे दुष्कृत्य जाणीवपूर्वक करण्यात आले असून या घटनेच्या मागे ‘लँड जिहाद’चे कारस्थान असल्याचा संशय आहे. त्यासाठी गुन्हेगारांना त्वीरत अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.
२. याविषयी एक स्थानिक रहिवासी म्हणाले की, काही वर्षांपासून या भागात धर्मांध मुसलमान गुंडांचा वावर वाढला असून संध्याकाळ झाल्यावर महिलांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. याविषयी विचारणा केल्यास ते दगडफेक करतात.
पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून गुन्हेगारांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती
या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, घटना घडून १० दिवस उलटून गेले, तरी आतापर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला अटक न होणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेऊन धर्मांधांना त्वरित अटक करावी, तसेच सीसीटीव्ही लावावा आणि मंदिराला संरक्षण पुरवावे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांच्या संदर्भात इतकी निष्क्रीयता हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने आक्रमणाला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करून राज्यातील प्रत्येक मंदिराचे संरक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते ! |