विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवण्यासाठी उर्दू शाळेतील मुसलमान मुख्य शिक्षिकेकडून हिंदु शिक्षिकेवर दबाब !
खोटी उपस्थिती दाखवून लाटण्यात येते सरकारी अनुदान !
दावणगेरे (कर्नाटक) – येथील एका उर्दू शाळेत काम करणार्या हिंदु शिक्षिकेवर शाळेतील मुख्य शिक्षिका रूमिनाज या ‘विद्यार्थी शाळेत आले नाहीत, तरी ते उपस्थित होते’, असे दाखवण्यासाठी दबाव आणायच्या. यावर हिंदु शिक्षिकेने ‘अशी खोटी उपस्थिती दाखवणार नाही’, असे सांगितल्याने गेले ३ मास रूमिनाज यांनी या हिंदु शिक्षिकेला वेतन दिले नव्हते. त्यामुळे या शिक्षिकेने पोलीस ठाण्यास तक्रार प्रविष्ट केली. ‘विद्यार्थी वर्गात उपस्थित नसतांना त्यांना उपस्थित दाखवून शासनाला खोटा अहवाल सादर करून अनुदान घेण्यात येत आहे, त्याविषयी चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या शिक्षिकेने या तक्रारीत केली आहे.
खोटा अहवाल सादर करून सरकारी अनुदान लाटणार्या शाळांची मान्यता रहित करा ! – हिंदु जनजागृती समिती
या घटनेविषयी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘राज्यात सहस्त्रो उर्दू शाळा असून ‘शाळेत विद्यार्थी उपस्थित असल्याविषयी खोटा अहवाल सादर करून सरकारी अनुदान घेण्यात येते’, अशा अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. संपूर्ण राज्यातील उर्दू-अरबी शाळा, तसेच मदरसे यांमधील भ्रष्टाचारांविषयी चौकशी करून सरकारने अशा शाळांची मान्यता तत्परतेने रहित करावी.’’
संपादकीय भूमिकाकर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |