कामावर परत न आल्यास कारवाई करणार !
संपकरी अधिवक्त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाची चेतावणी
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – कानपूरमधील अधिवक्त्यांनी २५ मार्चपासून संप करून न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने या अधिवकत्यांना चेतावणी दिली आहे की, त्यांनी कामावर परत यावे अन्यथा त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्यारून कारवाई केली जाईल.
इलाहाबाद हाईकोर्ट की 7 जजो की खंडपीठ ने कानपुर बार एसोसिएशन के वकीलो को काम पर लौटने या अवमानना का सामना करने का निर्देश दिया https://t.co/yeMupY1ILk
— बार & बेंच – Hindi Bar & Bench (@Hbarandbench) April 7, 2023
अशा आंदोलनासाठी पुढाकार घेणार्या कानपूर बार असोसिएशनच्या काही अधिवक्त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कानपूर बार असोसिएशन आणि लॉयर्स असोसिएशन कानपूर यांनी एका जिल्हा न्यायाधिशाने अधिवक्त्यांशी केलेल्या अवमानकारक वागणुकीमुळे संपाचे आवाहन केले होते.