८१ सहस्र डिटोनेटर्स (स्फोटके) आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी करणार्या २ जिहाद्यांना बंगालमधून अटक !
|
कोलकाता – वर्ष २०२२ मध्ये ८१ सहस्र डिटोनेटर्स आणि २७ सहस्र किलो अमोनियम नायट्रेट यांची तस्करी केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बोकारो येथील मेजारुद्दीन अली खान आणि बीरभूम येथील मीर महंमद नुरुज्जमा यांना अनुक्रमे राणीगंज अन् कोलकाता येथून अटक केली. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांची चिंता वाढली आहे. ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांची तस्करी कशी करण्यात आली ?’, याची अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा स्फोट झाला असता, तर एखादे मोठे शहर नष्ट झाले असते.
NIA ARRESTS TWO IN WEST BENGAL DETONATOR SEIZURE CASE pic.twitter.com/gayJqx1f1W
— NIA India (@NIA_India) April 3, 2023
वर्ष २०२२ मध्ये स्फोटके झाली होती जप्त !
बंगालच्या विशेष कृती दलाच्या पोलिसांनी जून २०२२ मध्ये एक चारचाकी गाडी अडवली. या गाडीमध्ये ८१ सहस्र इलेक्ट्रिक डिटोनेटर होते. या गाडीच्या चालकाला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनंतर २७ सहस्र किलोग्राम अमोनियम नायट्रेट, १ सहस्र ६२५ किलोग्राम जिलेटिनच्या कांड्या आणि २ सहस्रांहून अधिक इलेक्ट्रिक डिटोनेटर यांचा साठा जप्त करण्यात आला होता.
NIA arrests two in West Bengal detonator seizure case
Exclusive input: @manojkumargupta#TheRightStand #NIA #WestBengalSeizure #WestBengal | @AnchorAnandN pic.twitter.com/f7nfx4s0jP
— News18 (@CNNnews18) April 6, 2023
स्फोटकांच्या जप्तीमुळे बेरूत (लेबनन) स्फोटाच्या आठवणी ताज्या !
बंगालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या स्फोटकांच्या साठ्यामुळे ४ ऑगस्ट २०२० या दिवशी लेबननची राजधानी असलेल्या बेरूत येथे झालेल्या भयंकर स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या. बेरूत येथे गोदामामध्ये जप्त केलेले २ सहस्र ७५० टन अमोनियम नायट्रेट ठेवले होते. याच्या झालेल्या स्फोटामुळे शहरातील १० किलोमीटरपर्यंतचा परिसर पूर्णपणे नष्ट झाला होता.
संपादकीय भूमिका
|