२० कोटी किमतीचे १ सहस्र ९७० ग्रॅम कोकेन जप्त !
|
मुंबई – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी ५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचा अपप्रकार उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकी व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी २० कोटी किमतीचे १ सहस्र ९७० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आदिस अबाबाहून मुंबईत परतलेल्या ३५ वर्षीय आरोपीकडे हे कोकेन आढळले. तो त्याच्या साथीदारांना कोकेन देणार होता. पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची तस्करी करणार्यांना वेळच्या वेळी कठोर शिक्षा होत नसल्याचाच हा परिणाम ! |