जोतिबा यात्रेच्या (जिल्हा कोल्हापूर) काळात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त !
कोल्हापूर – जोतिबा देवाच्या यात्रेच्या काळात जोतिबा डोंगर, तसेच कोल्हापूर बसस्थानक येथे झालेल्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त झाले आहेत. जोतिबाच्या डोंगरावर गळ्यातील साखळी, मंगळसूत्र चोरून नेणे, खिशातील पाकीट चोरून नेणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ६ एप्रिलला शहरातील मुख्य बसस्थानकात प्रवाशांनी एका चोरट्याला पकडले असता त्याने प्रवाशांवर चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. ‘पोलिसांनी पहारा वाढवून, तसेच अधिक सतर्कतेने काम करणे आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत. (कायदा-सुव्यवस्थेचे अपयश ! – संपादक)