सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या विशेषांकाचे वितरण करतांना आलेली अनुभूती
‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) वर्ष २०२१ च्या ७९ व्या जन्मदिनानिमित्त विशेषांक छापण्यात आले होते. मला त्यांच्या जन्मोत्सवाच्या ७.३.२०२१ च्या विशेषांकाचे वितरण करण्याची सेवा मिळाली. मी अंक पाठीवरच्या पिशवीत घातले. तेव्हा मला पिशवी जड वाटली. अंक १७ च होते, तरी मला असे जाणवले की, यात ‘गुरुपादुका’ आहेत. दुसर्या दिवशी मी ते अंक पुन्हा पिशवीत ठेवले. त्या वेळी मला आरंभी पिशवी जड वाटली आणि लगेचच हलकीही वाटली. माझी प्रकृती ठीक नव्हती. त्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर अंक वितरण करतांना ‘गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या दुचाकीवर मागे बसले आहेत’, असे मला जाणवले. त्यांनीच माझ्याकडून सर्व अंक वितरित करून घेतले. गुरुमाऊली, ही अनुभूती दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. राजश्री पंचवाडकर, कोथरूड, पुणे.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |